थिएटर ऑफ रेलेवन्स बालनाट्य कार्यशाळा
गणेश प्रार्थमिक विद्यालय, टिटवाळा
21 ते 23 डिसेंबर 2017
थिएटर ऑफ रेलेवन्स कलात्मक नाट्यमहोत्सव 2017, पनवेल येथे संपन्न झाल्यावर आता वेळ होती मिळवलेल्या कलात्मक उंची ला व्यक्तिगत प्रक्रिया मध्ये रुजवण्याची. 20 तारखेला संपन्न झालेल्या उत्सवाने अशी ऊर्जा दिली की आता काळ थांबता थांबेना... 21 तारखेची पहाट , एकदम फ्रेश , सुंदर आणि टिटवाळ्याच्या शाळेतल्या बालनाट्य शिबिराचे नियोजन.
तिसरी ते चौथीतील लहान मुलांचे नाट्य शिबीर... निरागसता, शुद्धता, पावन मन, प्रश्न, नितळ स्वभाव आणि मज्जा अशा तत्त्वांनी उगवणारे हे भावी अंकुर... या अंकुरांना नाटकाच्या माध्यमातून योग्य मार्गदर्शन करण्यासाठी "थिएटर ऑफ रेलेवन्स" टीमला (अश्विनी , सायली, कोमल आणि तुषार) बोलावले...
' शाळा ' हे ऐकताच मनात एक चित्र तयार होतं.. एक मोठं मैदान, चहू बाजूंनी कुंपणासारखी मोठी दाट झाडं, तास संपल्यावर जोरजोरात वाजणारी घंटा आणि ' कोणाचा आवाज मोठा ' अशी मुलांची व शिक्षकांची जुगलबंदी... पायऱ्या आणि गेट वर सुंदर अशी रांगोळी आणि प्रवेश करताच ' हे कोण आले बरं ?' असा प्रश्न विचारणारे कुतूहल डोळे... सत्कार सोहळा झाल्यावर 120 मुलांच्या टाळ्यांचा गडगडाट आणि त्यांना पहिलाच प्रश्न - ' तुम्हाला हो म्हणता येत का ? ' ..अश्विनीचा ' पिल्लेलू ' आणि मुलांचा ' हो !!' याने धम्माल ला सुरुवात झाली..
नाटक म्हणजे काय ? कृती, कला, अभिनय, कलाकार, मज्जा अशी विविध उत्तरं.. इथे चूक किंवा बरोबर असं काहीच नसतं, विचारलेल्या प्रश्नच माझ्या मनात आलेलं उत्तर हे नेहमीच सगळ्यांपेक्षा वेगळं आहे हेे समजल्यावर प्रत्येक मुलीचा आणि मुलाचा सहभाग वाढला.. आवाजाचा चढ उतार, शारीरिक व्यायाम, थोडं नृत्य, थोडी दृश्य अशा अभ्यासाने मुलांनी स्वतः आपल्या नाटकाचे विषय निवडून त्यावर दृश्य रचना तयार केल्या.. माझं गाव, माझी शाळा आणि शेतकरी असे या मुलांचे एकात्मतेने आलेले विषय.. थिएटर ऑफ रेलेवन्स मध्ये नाटकाच्या माध्यमातून आयुष्याला शिकण्याची दृष्टी मिळते आणि जीवन शिकण्याचा तास हा चार भिंतीत कसा होऊ शकतो ?? म्हणून पूर्ण मैदानात मातीचा स्पर्शात, दगडाची ओळख करत, झाडांच्या सावलीत, मनमोकळ्या वातावरणात मुलांनी नाट्य रचना तयार केल्या....
शाळेची मुख्याध्यापिका अतिशय कलात्मक आणि संवेदनशील. मुलांवर होणाऱ्या प्रत्येक प्रक्रियेत त्या सहभागी होत्या व शिक्षकांना ही सहभागी करत होत्या... आपल्या मुलांना विशेष शिकायला काय मिळतंय हे सर्व त्या टिपत होत्या.. मुलांना फक्त पुस्तकापर्यंत मर्यादित न ठेवता त्यांना व्यावहारिक (प्रॅक्टिकल) किती जास्त अनुभवता येईल यावर त्यांचा भर होता आणि थिएटर ऑफ रेलेवन्स प्रक्रिया हीच आहे की तत्वाला, शिकवणला निव्वळ स्वतःच्या समजण्यापुरतं मर्यादित न ठेवता त्याची आयुष्यात अमलबजावणी करणं खूप आवश्यक आहे..
तसेच कार्यशाळेच्या पहिल्या दिवसाचे विशेष म्हणजे थिएटर ऑफ रेलेवन्स हे नाट्यतत्व आणि गणेश प्रार्थमिक विद्यालय या दोन्ही संस्था आपले 25 वर्ष संपूर्ण झाल्याचे रौप्यमहोत्सव कलात्मक रित्याने एकमेकांसोबत साजरा करत होते.. 120 मुलांची शिकण्याची इच्छा, त्यांची निरागस मानसिकता आणि भावना, हे त्यांना वैचारिक रित्या घडविण्यास सहाय्य करत होते..
थिएटर ऑफ रेलेवंस पद्धती आणि प्रक्रिया :
१. गोल बनाओ गोल बडा बनाओ गोल : प्रत्येकाला एकाच वेळी प्रत्येकाचे चेहरे दिसतील, प्रत्येकाशी संवाद साधता येईल आणि आपल्याला प्रत्येक जण बघू शकेल असे उभे रहायचे होते. आता सगळे सहभागी विचार करु लागले आणि त्यांच्यातूनच उत्तर आले कि “ गोलाकार “ मध्ये उभे राहूया. नाटक म्हणजे शिस्त, म्हणूनच शिस्तबद्ध पद्धतीने गोलाकार मध्ये उभे रहाण्यासाठी “ गोल बनाओ गोल “ हे गाणे / नारा म्हणत प्रत्येकाने एक मोठे वर्तुळ तयार केले. यात आवाजाची उंची, एकत्र बोलणे, प्रत्येक सहभागी सोबत असलेली सांगड आणि निरीक्षण वाढले.
२. मुलगा मुलगी एक समान , समान संधीचा दोघांना मान : आपण वर्तुळात उभे तर राहिलो पण त्यातही दोन वेगळी चित्र दिसू लागलेली. एक बाजू मुलांची आणि दुसरी बाजू मुलींची. आपण समानता - समानतेचे नारे लावतो पण मुळात परिवर्तन होत नाही. मूळ परिवर्तन हे विचारांमध्ये व्हायला हवे, जसे आपल्या घरात आपण सगळे एकत्र रहातो मग शाळेत, कामाच्या ठिकाणी किंवा समाजात आपण एकत्र माणूस म्हणून का नाही राहू शकत ? हे विचार आणि प्रत्येक मित्र मैत्रिणीला माणूस म्हणून बघण्याचा दृष्टीकोन मिळाल्या नंतर चित्र बदलले आणि एक मुलगा एक मुलगी असं प्रत्येक वेळी वर्तुळ तयार होऊ लागले.
३. सजीव कि निर्जीव : आपण सजीव आहोत तर का याचा विचार करणे खूप आवश्यक आहे… सजीव म्हणजे निव्वळ श्वास घेणे नाही तर आपल्याकडे “ मेंदू ” आहे जो विचार करतो, आणि विचार केल्यामुळे आपण आपले निर्णय घेऊ शकतो. हेच निर्णय आपल्यला आयुष्यात सक्षम करतात. या कार्यशाळेत मुलांनी सर्व निर्णय स्वतः घेतले आणि घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी सुद्धा त्यांनी स्वतः पूर्ण केली. यामुळे त्यांच्यातला आत्मविश्वास बळकट होत गेला आणि आपण challenge स्वीकारून त्यांना स्वतःहून पूर्ण करू शकतो हा विश्वास निर्माण झाला.
४. मी स्वतःवर खूप प्रेम करते : प्रत्येक दिवशी आपण आपले स्वतःचे नाव किती वेळा घेऊन प्रफुल्लीत होतो, आपलेच नाव आपण निसर्गातील प्रत्येक तत्वांना किती वेळा सांगतो ? हेच या मुलांसाठी नवीन होते. रोज होणारा आवाजाचा अभ्यास प्रत्येकवेळी मुलांमधला विश्वास अधिक वाढवत होता कारण त्यांचा आवाज आता मोठा होत होता. ते आता प्रत्येकाचे लक्ष वेधू लागलेले, ते आता त्यांच्यापेक्षाही लहानांसाठी प्रेरणा झाले होते. आपले नाव मोठ्याने ओरडून शाळेच्या मैदानात सर्वीकडे पळायचे आणि प्रत्येक झाडाला, दगडाला, गवताला, माणसांना स्वतःवर किती प्रेम करतो हे जोरजोरात सांगायचे. मुख्याध्यापिकांसाठी हे दृश्य अविस्मरणीय राहिले. शाळेच्या गर्भातून उन्मुक्त पक्ष्यांचा थवा सगळे बंध तोडून संपूर्ण मैदानात उन्मुक्त विहार करत होता, जणू काही समुद्राची खूप मोठी लाट एक कलात्मक उर्जेची स्थापना करत आहे. खरच आपण प्रकृती ला हाक दिली कि प्रकृती आपल्याला नितळ प्रतिसाद देते, याहून सुंदर आणि विलक्षण दृश्य अजून काय असू शकते !!
५. दृश्य निर्मिती : मुलांची कल्पना शक्ती, विषयाची निवड, आणि आपल्या नाटकात विषयाशी निगडीत असलेले दृश्य मुलांनी स्वतः तयार केले… उत्तम नाटक प्रस्तुत करण्यासाठी संवाद पेक्षा दृश्य निर्मिती ने ही होऊ शकतात हे मुलांना नव्याने उमगले.. गावातली शेती असुदे किंवा शाळेच्या भिंतीवर असलेली सुंदर चित्रे सगळे दृश्य मुलांनी त्यांच्या कल्पनेने तयार केले.. मोठ्या संवादात अडकण्यापेक्षा मोठे आणि सुटसुटीत दृश्य तयार केले तर संदेश लवकर, थेट आणि सहज समजतो. म्हणूनच निसर्ग, माझी शाळा. माझे मैदान, माझा देश, राज्य, गाव आणि माझ्या सवयी यांवर दृश्य तयार करण्यात आली, त्यांचे नियमित सराव आणि प्रस्तुती, प्रस्तुती नंतर मुलांना त्यातून काय समजले याची नोंद आणि जे समजले तेच संवाद म्हणून नाटकात उपयोगी आले.
६. दुगडी दुगडी : “ दुगडी दुगडी ” म्हणजे लहान मुलांची आवडती प्रक्रिया. म्हणता येईल की या प्रक्रियेत अशी जादू आहे कि भली मोठी माणसं सुद्धा लहान निरागस होऊन जातात. यात दुगडी दुगडी च्या तालावर स्वतःहून निर्मित केलेली एक कृती ( style) करायची आणि सगळ्या समूहाला आपल्या सोबत त्या तालावर नाचायला सांगायचे म्हणजे आवाज, शरीर, नाविन्याचा शोध, उत्स्फूर्तपणा, मज्जा आणि प्रत्येक सहभागी इथे लीडर होतो.
3 दिवसांच्या या कार्यशाळेत “ थिएटर ऑफ रेलेवंस “ या प्रक्रीयेमधून मुलांसोबत शिक्षक ही शिकत गेले. मुलांना शिकवण्याची पद्धत काय, उर्जा काय आणि साहित्य कोणते, हे जाणून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. गाणी, नाटकाचे दृश्य, त्यासाठी असलेला उपयुक्त अभ्यास करता करता मुलं सकारात्मक सवयी सुद्धा अंगी लावत होते.. सवय तेव्हाच होते जेव्हा त्या सवयीचे उद्देश्य आपल्या विचारांमध्ये स्पष्ट असते.. मग तेव्हा पुन्हा सांगण्याची गरज लागत नाही.. आणि थिएटर ऑफ रेलेवन्स ही प्रक्रिया नाटकाच्या माध्यमातून आयुष्याला सकारात्मक आणि रचनात्मक दिशा देण्यासाठी स्वतःतील वैचारिक व्याप्ती वाढवते जेणेकरून आपण चांगल्या सवयींना स्वीकारून त्यांना अमलात आणायला लागतो.
शिक्षकांसाठी ही कार्यशाळा उत्तम मार्गदर्शन ठरली. मुलांच्या स्तरावर जाऊन त्यांची वैचारिक क्षमता कलात्मक पद्धतीने कशी वाढवता येऊ शकते हे त्यांनी प्रत्यक्ष अनुभवले. मुलांना विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर हे जोपर्यंत प्रत्येक विध्यार्थी देत नाही तोपर्यंत गाडी पुढे जाणार नाही, अशा पद्धतीने प्रत्येक विध्यार्थी कडून उत्तरं यायला लागली जेणेकरून प्रत्येकाचे मेंदू working status मध्ये आहे हे समजले आणि आपला संवाद प्रत्येकाशी होत आहे याची खात्री झाली. शिक्षकांचा प्रतिसाद शेवटच्या दिवशी अप्रतिम होता. काही मुलं जी वर्गात बोलत सुद्धा नव्हती अशा मुलांनी नाटकाची सुरुवात केली, हे पाहूनच शिक्षकांचे मन भरून आले. आपण प्रश्न विचारल्यावर उत्तरं देण्यासाठी मुलांचा इतका पुढाकार पहिल्यांदाच शिक्षकांनी पाहिला.. मुलांमध्ये आलेले बद्दल ते स्वतः अनुभवत होते आणि शिक्षकांना ही त्या बदलची जाणीव करून देत होते. “ थिएटर ऑफ रेलेवंस “ हि प्रक्रिया कमजोर कडी पासून सुरुवात करत त्याला सक्षम करत पूर्ण समूहाला सक्षम करते. जागा तीच, व्यक्ती त्याच, मुलं तीच, वेळ तीच पण पाहण्याची दृष्टी आणि अनुभवलेले वातावरण निर्मिती हे वेगळी होते.
या कार्याशाळेतून मी एक कलाकार, एक व्यक्ती आणि एक उत्तम उत्प्रेरक म्हणून खूप सक्षम होत आहे हे मला जाणवले. या मुलांकडून मिळालेली उर्जा, जिज्ञासा, शिकण्याची ओढ आणि निरागसता घेऊन मी पुढे माझी वाटचाल करत आहे एक उत्तम व्यक्तित्व घडवण्यासाठी.
थिएटर ऑफ रेलेवंस अभ्यासक आणि रंगकर्मी
कोमल खामकर ( कठोर )
komalkhamkar08@gmail.com