ओळख..
ह्या जगातला प्रत्येक व्यक्ति स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी कष्ट करत असतो.. आपल्या स्वप्नांना , ध्येयाला पूर्ण करण्यासाठी सतत कार्य करत असतो.. आपले ध्येय पूर्ण झाले कि दरवेळी आपली ओळख नव्याने निर्माण होते , आणि म्हणूनच जीवनात ध्येय असावे.. हे ध्येय पाहण्याची दृष्टि आपल्या तत्वातून मिळते.. " जीवन तत्व " ज्याच्या शिवाय आपल्या जगण्याला काही अर्थ राहत नाही.. म्हणजे उदाहरणार्थ - माणूस हा पंचतत्वांनी बनलेला आहे , आग , वायू , माती , आकाश आणि पाणी ह्या सगळ्या प्राकृतिक तत्वांची समान गरज आहे तरच सृजना होते... तसेच आपली ओळख निर्माण करणारे जीवन तत्व कोणते ह्याचा शोध घेणे अत्यंत आवश्यक आहे...
हा शोध आहे एका कलाकारातल्या व्यक्तिचा , व्यक्तिमत्वाचा आणि व्यक्तित्वाचा... व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्व ह्या दोघांची रचना वैचारिक रित्या घडत गेली कि आपोआप व्यक्ति सशक्त होत जातो..एक कलाकार आणि व्यक्ति एकाच वेळी घडताना मी अनुभवले आहे... आतापर्यंत अशी कुठलीच नाट्य प्रक्रिया मी पहिली नाही जी कलाकार आणि व्यक्ति दोघांना एकाचवेळी प्राधान्य देऊन , दोघांवर कलात्मकतेने काम करते.." थिएटर ऑफ रेलेव्हन्स " नाट्य प्रक्रिया , त्याच्या अंतर्गत प्रस्तुत होणारी नाटके , त्यातून प्रकट होणारे विचार , ह्यातून कलाकार रंगमंचावर उन्मुक्त होतोच पण नाटकातून मिळालेले तत्व आयुष्यात अमलात आणून तो व्यक्ति हि उन्मुक्त होतो... आणि हीच कलात्मकतेने उन्मुक्त करणारी प्रक्रिया मला खूप आवडते...

सुरुवात करेन 6 ऑक्टोबर 2017 पासून.. आम्ही सगळे " थिएटर ऑफ रेलेव्हन्स - कलात्मक अन्वेषण " कार्यशाळेसाठी शांतिवन , पनवेलला पोहोचलो... " मंजुल भारद्वाज " कार्यशाळेचे उत्प्रेरक आणि आमचे सर , ह्यांनी आम्हाला सुरुवातीलाच प्रश्न विचारले कि ते स्वतः कसे जगतात आणि त्यांचे व्यक्तित्व व व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे आयाम कुठले.. मुद्दे लिहीत असताना कळत होते कि व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्व हे अदृश्य असतात आणि व्यक्ति च्या माध्यमातून ते आपल्याला स्पष्ट होतात... पण जेव्हा व्यक्तिचे संप्रेषण कौशल्य , वागणुकीत , अभिव्यक्ती मध्ये स्पष्टता नसेल तेव्हा व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्व दोघेही डगमगतात... हे आमच्या सोबत होऊ नये म्हणून सर आम्हाला पदोपदी सावध करायचे , पण आता वेळ आम्हीच स्वतःला सावध करण्याची आली होती... प्रस्थापित रंगभूमीवर काम करणारी कुठलीच व्यक्ति इतके सूक्ष्म विषय पकडत नाही , कलाकारा सोबत व्यक्तिला घडवत नाही , निव्वळ कलाकार घडवल्यामुळे रंगभूमीचे बादशाह होऊन जातात पण आयुष्याच्या विचारमंचावर गुलाम म्हणूनच जगतात...
व्यक्ति तेव्हाच मजबूत असतो जेव्हा तो स्वतःचे निर्णय स्वतः घेतो.. आणि इथेच " आम्ही आहोत " हे दिसते - थिएटर ऑफ रेलेव्हन्स नाट्य सिद्धांताचे एक तत्व म्हणजे एका सकारात्मक आणि सृजनात्मक व्यक्तिमत्व घडण्यासाठी दुसऱ्यांवर अवलंबून न राहता स्वतःचे निर्णय स्वतः घेणे , आणि निर्णय तोच घेतो जो प्रत्येक गोष्टीत सहभागी असतो... निर्णय घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तिला स्वामित्वाचा जोड असते आणि ते स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाते..

कलात्मक सृजनेच्या मार्गावर आम्ही थिएटर ऑफ रेलेवन्स चे कलासाधक सातत्याने कलेची खरी परिभाषा रचत आहोत.. त्यात नाविन्य , शोध , कलात्मकता , अभ्यास , प्रयोग , यश - अपयश , माहिती ह्या सर्व आयामांनी सक्षम होत आहोत.. पण मुळात पहिला आणि महत्वाचा बिंदू म्हणजे " इच्छा " , आपण " वेगळं " बोलतो खरं पण खरंच आपल्याला वेगळं जगण्याची इच्छा आहे का ? ह्या प्रश्नाचं मंथन आम्ही सर्वांनी ह्या कार्यशाळेत केले.. विचार आणि मंथन प्रक्रियेला योग्य गति आणि दिशा मिळण्यासाठी सरांनी आमच्यासोबत एक अभ्यास केला.. सरांची ओळख म्हणजे 'रंगचिंतक ' आणि रंगचिंतक हा थिएटरशी निगडित असतो म्हणून प्रस्थापित थिएटर ची ओळख काय तर - नेपथ्य , कलाकार , लेखन , दिग्दर्शन , प्रेक्षक , निर्माते .. असे करत प्रत्येक बिंदू वर आम्ही एक एक खुर्ची रंगमंचावर नेऊन ठेवली... सगळ्या खुर्च्या ठेवल्यावर लक्षात आले कि ही वषांनो वर्ष चालत आलेली एक साचेबद्ध फ्रेम आहे , आणि ह्या फ्रेम मध्ये रंगचिंतकांची खुर्चीच नाही !! एका क्षणासाठी असे वाटले कि आपण ज्या रंगभूमीवर आपली जागा निर्माण करायला चाललो आहे तिथे तर आधीच सगळ्यांनी जागा व्यापून घेतली आहे.... मग रंगचिंतनाचे योगदान कुठे ??? मग आपण दुसरीकडे आपली जागा निर्माण करावी का , तर नाही... कारण रंगभूमीला पावन करायला , तिची नवीन कलात्मक ओळख स्थापित करायला तिथेच राहून रंगचिंतकांची खुर्ची निर्माण करावी लागणार.. ह्यावर अश्विनीचे उत्तर अगदी संशोधन पद्धतीचे वाटले - पहिले तर वेगळं जगण्याची इच्छा असणे , त्याने आपल्यात जिज्ञासा निर्माण होते , ज्यामुळे आपण नाविन्याचा शोध करण्यास प्रेरित होतो , सतत अभ्यास केल्याने आपण स्वतःवर प्रयोग करायला लागतो , त्यातून मिळालेले यश आणि अपयशातून आपल्याला शिकवण मिळते , ती शिकवण लक्षात ठेऊन आपण दुसऱ्यांवर प्रयोग करायला सुरु करतो , हळू हळू प्रत्येक खुर्चीचा आपण अभ्यास करतो आणि त्या क्षेत्राचे विशेषज्ञ होतो... इतक्या सगळ्या प्रक्रिये नंतर जन्म होतो " रंगचिंतकांचा "...

हे संशोधनाचे बिंदू स्पष्ट झाल्यावर आम्ही त्यावर एक प्रस्तुती तयार केली... आणि ती प्रस्तुती तयार करत असताना मला जाणवत होते कि एक रंगचिंतक आणि मी स्वतः एकत्र यात्रा करत आहोत , जिथे एक कलाकार म्हणून मी रंगचिंतकांची भूमिका करत होते आणि एक व्यक्ति म्हणून माझ्यात काय अपूर्ण आहे त्याची नोंद घेत होते... एक कलाकार ते व्यक्ति आणि व्यक्ति ते कलाकार मधला पूर्णत्वाचा संवाद !!!!!
to be continued...
Theatre Of Relevance Practitioner and Performer
Komal Khamkar
komalkhamkar08@gmail.com