Komal Khamkar
Thursday, 13 January 2022
Saturday, 20 July 2019
माझ्यातल्या अंतर्नादची उन्मुक्त हुंकार...
प्रेरणा मिळते ती विचारांनी, विचार संदर्भ शोधतात, संदर्भ शोध प्रक्रियेला वाढीस लावतात आणि स्व अस्तित्वाची निर्मिती होते. खरच, कलाकारामध्ये अस्तित्व निर्माण करण्याची दृष्टी जोपर्यंत सृजित होत नाही, तोपर्यंत प्रत्येक संदर्भाशी तो नातं कसा जोडेल..? आणि हे नातं जुळले नाही तर मग नाटकातल्या पात्राची बौध्दिकता, त्याची कलात्मक उंची, वैचारिक प्रतिबद्धता कशी गाठणार ? अभिनयासाठी हे तीन पैलू अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात :
1. मी स्वतः कोण आहे ?
2. माझ्या पात्राची बौद्धिक पातळी आणि कलात्मक उंची काय आहे ?
3. दृष्टी संपन्न अभिनय
कला ही निरंतर शोध प्रक्रिया आहे, जेव्हा कुठलाही कलाकार एकाच अनुभवला, संदर्भाला घेऊन मंचावर येतो आणि त्याच अनुभवाच्या जोरावर अनेक प्रयोगात आपली भूमिका पार पाडत असतो, तेव्हा त्याला कलाकार म्हणता येणार नाही, तो एक mechanized actor आहे, ज्याला तीच वातावरण निर्मिती लागते, त्याच अनुभवाचा आधार हवा असतो, तेच styles हवे असतात आणि त्याच टाळ्यांच्या गडगडाटीची भूक असते… खरंतर कलाकार म्हणजे क्षणोक्षणी होणारी सृजना जी कुठल्याच ठरलेल्या साच्यात बसत नाही.. कधी आपण हा विचार करतो का, की या टाळ्यांच्या कल्लोळापलीकडे कलाकाराचा स्वतःचा एक आवाज आहे, जो ऐकण्याऐवजी दरवेळी दुर्लक्षित होत असतो ?
असं म्हंटलं जातं की कलाकाराला आवाज असतो. तो त्या आवाजाने वेगवेगळी पात्र, भूमिका साकारतो, लेखकाच्या विचाराला आपल्या अभिनय कौशल्याने, आवाजाच्या माध्यमाने प्रत्येक विचार प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो. दृश्य, सदृश्य, अदृश्य अश्या कैक विचारांची किमया आवाजाच्या तरंगांतून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत , अखंड वातावरणात चैतन्य निर्माण करून कलात्मकतेचा उदय करतो. मी आता पर्यंत रंगभूमीवर जेवढी नाटकं पाहिली / केली, त्या प्रत्येक नाटकांमध्ये मी ध्वनी यंत्रणा , संगीत संयोजन , आवाचा चढ-उतार, आवाजाने प्रेक्षकांना होल्ड करणे हे सगळे महत्वाचे पैलू अनुभवत आले, पण या सर्व प्रवासात माझी एक बाजू सुटत होती ती म्हणजे स्वतःच्या आतला आवाज ऐकण्याची.
स्वतःचा आवाज ऐकणे म्हणजे नेमकं काय ? जिवंत असल्याची निशाणी.. स्वतःशी संवाद करण्याची सुरुवात.. खरेपणा आणि माणुसकीला रुजवण्याची प्रक्रिया.. संवेदना आणि सहवेदनांची जाणीव.. या सगळ्या मानवी मूल्यांना मुळापासून नष्ट करण्याचे षडयंत्र आज "बाजारीकरण" रचत आहे. फेम आणि ग्लॅमरच्या चौकटीत अडकून कलाकार कठपुतली होत आहेत. दुसऱ्यांच्या इशाऱ्यावर केवळ शारीरिक क्रिया करणे, ज्यात स्वतःच्या मेंदूचा, विचारांचा, तत्वांचा काहीच उपयोग होणार नाही असे षडयंत्र रचले जात आहे. प्रसिद्धी मिळवण्यासाठी कलाकाराने साधलेली सिद्धी त्याच्या हातून सुटत चालली आहे, याची कलाकारांना अजून जाणीव ही होत नाही.
रंगचिंतक मंजुल भारद्वाज द्वारा लिखित दिग्दर्शित नाटक “अनहद नाद - Unheard Sounds of Universe” मधल्या “अपनी अनसूनी आवाज सुनो “ या गाण्यामूळे मला स्व-अस्तित्वाची जाणीव झाली. अश्या चंदेरी दुनियेत जिथे दिखाव्याला महत्व दिले जाते, जिथे कला / नाटक म्हणजे केवळ मनोरंजनाचे साधन म्हणून पाहिले जाते, जिथे रंगभूमीवर मुखवटा चढवून केवळ प्रसिद्धीसाठी कलेचा ऱ्हास होत आहे, तिथे या नाट्य प्रक्रियेतून मी स्वतःचे सत्व साधून, कलेला आणि कलाकारांना उन्मुक्त करत, कलात्मक सत्व जपत आहे. आणि या कलात्मक सत्वाने आयुष्य जगण्याचे सौंदर्य वाढवत आहे.
रंगकर्म एक साधना आहे आणि अभिनय म्हणजे अभिव्यक्तीची निरंतर असणारी शोध प्रक्रिया. कलाकाराची साधना हीच त्याची खरी सिद्धी आहे, आणि हीच प्रक्रिया आपोआप प्रसिद्धी ही मिळवून देते. एक अशी ओळख जी कायमस्वरूपी आपली राहते. "अपनी अनसूनी आवाज सुनो" या गाण्याने मला, माझी एक जगावेगळी ओळख मिळवून दिली. हे गाणं गात असताना जशी मी स्वतःच्या आत जाऊ लागते तसा माझा स्वतःचा आत्मिकशोध सुरू होतो. प्रेक्षक जेव्हा हे गाणं ऐकतात तेव्हा त्यांना ही या आत्मशोधाची प्रचिती होते आणि प्रत्येक जण स्वतःचा आवाज ऐकण्यासाठी स्वयंप्रेरित होतो. कलाकार रंगभूमीवर अनेक पात्र साकारतो, पण तो आयुष्यात व्यक्ती म्हणून कोण आहे हे जोपर्यंत त्याला माहित नसेल तोपर्यंत तो उत्तम कलाकार होऊच शकत नाही. यासाठी आत्मशोध ही प्रक्रिया खूप महत्त्वाची ठरते. या नाटकाने माझ्यातल्या कलाकाराला तर बहरलेच सोबत माझ्यातल्या व्यक्तीला आकार देण्याची शक्ती ही मला दिली.
नाटकात / कलेत ही ताकद असते की माणसाच्या व्यक्तिगत अनुभवला सकारात्मक दिशा देण्यासाठी आणि त्याला उन्मुक्त करण्यासाठी, माणसातल्या दडलेल्या "कलेला" नाटक जिवंत करते. माणूस हा शरीर आहे तर कलाकार त्यातला प्राण ! हा कलाकार नाटकातल्या पात्राची बौध्दिकता समजून , स्वतःच्या कलात्मक सत्वाला प्राप्त करून , व्यक्तीला कलेशी जोडतो आणि दोघांचाही स्तर वाढवतो. अशी प्रक्रिया व्यक्ती आणि कलाकार दोघांना समृद्ध करते. आणि थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांतानुसार कलाकार आणि व्यक्ती हे दोघेही दोन वेगळ्या भूमिका असल्या, यांच्या जगण्याचा मार्ग जरी वेगळा असला, यांचा प्रवास ही वेगळा असला, तरीही हे एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतात, collaborate करतात कारण कलाकार आपल्या सत्वातून कलेला समृद्ध करत असतो आणि व्यक्ती आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाला उन्मुक्तपणे जगत असतो.
"जीवन" ही जगण्याची एक "कला" आहे ! जसं कलेला विकलं जाऊ शकत नाही तसेच आयुष्यातल्या अनमोल अनुभवांना विकत घेतले जाऊ शकत नाही. या नाटकातून मी हेच शिकले की आपले आयुष्य हे नफा तोटा लिहिण्याची बॅलन्सशीट नाही आहे. एक कलाकार म्हणून आपल्या भावनांना वैचारिक दृष्टिकोन देऊन रंगमंचावर अभिव्यक्त होणे आणि एक व्यक्ती म्हणून आयुष्यातला प्रत्येक क्षण उन्मुक्तपणे जगणे हीच माझी कला आणि जीवनाप्रति निष्ठा आहे.
Sunday, 23 June 2019
कला ते क्रांती !
23 मार्च 2019 शहीद दिवस च्या निमित्ताने थिएटर ऑफ रेलेवंसच्या रंगकर्मींनी " कला ते क्रांती !" हा विचार घेऊन , विचार प्रेरणा नाट्य जागर साजरा केला .
स्वातंत्र्याचा इतिहास लिहिला गेला, आणि स्मरणात राहिला भारतातील स्वातंत्र्य संग्राम ! जाज्वल्य देशप्रेमाने सारा देश त्याकाळी भारून गेला होता. “आम्हाला स्वातंत्र्य हवेच” या प्रेरणेने सारे भारतीय एक होऊन इंग्रजांविरुद्ध लढत होते. प्रत्येक स्वातंत्र्य सैनिकांच्या हौतात्म्याला त्यांच्या विचारांना स्मरण्याचा दिवस ‘शहीद दिवस’ या दिवशी भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी स्वतंत्र भारतातील सूर्योदय पाहण्याकरिता, आपल्या देशासाठी हौतात्म्य स्वीकारले होते. या लढ्यात भारतीय स्त्रियाही मागे नव्हत्या. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारताच्या कानाकोपऱ्यांतून असंख्य अनामिक स्त्रिया भारतभूमीच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देण्यास सज्ज झाल्या. या असंख्य क्रांतिवीरांच्या योगदानाला आम्हा रंगकर्मींचा सलाम !
त्या अमर क्रांतिवीरांच्या लढाईचा संघर्ष जसा व्यापक आहे , तसाच समाज निर्माणासाठी सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांचे योगदान ही महत्वपूर्ण आहे.
त्यांच्या जगण्याचा उद्देश एकच , मुलींना शिक्षणाचा अधिकार मिळावा... या एकाच ध्येयाने झपाटून त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाज निर्माणासाठी समर्पित केले. आज आम्ही शोधली आहे सावित्री आमच्या आत.आम्ही शोधला भगतसिंह आमच्या आत, भगतसिंहने जीवनात वैचारिक क्रांतिची जी मशाल पेटवली, ती घेऊन आम्ही प्रत्येकात कलात्मक चेतना जागवत आहोत. कलेच्या माध्यमातून आम्ही सावित्रीबाई फुले यांचा वारसा पुढे घेऊन जात आहोत. जीवनासाठी कला, परिवर्तनासाठी कला या ध्येयाने आम्ही कलाकार समाजातील विभिन्न स्तरांतील मुद्यांवर - समस्यांवर कलेच्या म्हणजेच नाटकाच्या माध्यमातून प्रस्तुती करतो आणि परिवर्तनासाठी प्रेरित करतो.
3 जानेवारी 2019 , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती आणि 23 मार्च 2019 शहीद दिवस च्या निमित्ताने थिएटर ऑफ रेलेवंसच्या रंगकर्मींनी " कला ते क्रांती !" हा विचार घेऊन , विचार प्रेरणा नाट्य जागर साजरा केला.
या नाट्य जागरात दिनांक 22 मार्च 2019 रोजी दुपारी 2.00 वाजता वैश्विक रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांच्या मार्गदर्शनासह, हिंदुस्तान अँटीबायोटिक्स स्कुल, पिंपरी पुणे येथे " थिएटर ऑफ रेलेवंस शैक्षणिक चिंतन कार्यशाळा" आयोजित केली गेली आणि " मैं औरत हूँ " हे नाटक प्रस्तुती सादर करण्यात आली.
रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित नाटक – “मैं औरत हूँ !” – आपल्या असण्याची , त्याला स्वीकारण्याची आणि आपल्या "अस्तित्वाला" विभिन्न स्वरूपात पडताळण्याची , शोध घेण्याची एक यात्रा आहे. नाटक ‘मैं औरत हूँ!’ पितृसत्तात्मक भारतीय समाजाची मानसिकता , बंधन , परम्परा , समज यांना मुळापासून नाकारते आणि त्यांना खुले आवाहन देऊन स्वतःचे ‘स्वतंत्र मानवीय अस्तित्व’ स्वीकारते . हे नाटक महिला व पुरुषाला बरोबरीच्या आरशात न पाहता ‘स्त्री’ च्या ‘स्वतंत्र मानवीय अस्तित्वाला' रेखांकित आणि अधोरेखित करते. हे नाटक ‘कलाकार आणि प्रेक्षक’ साठी आत्म मुक्ततेचं माध्यम आहे. नाटकात अभिनय करताना ‘जेंडर समानता’ च्या संवेदनशीलतेशी कलाकार एकरूप होतात आणि नाटक बघताना ‘प्रेक्षक’ ‘जेंडर बायस’ या अविर्भावा पासून मुक्त होतात . नाटक ‘मैं औरत हूँ’ कलाकार आणि प्रेक्षकांवर अद्भुत प्रभाव पाडते. ‘नारी’ मुक्ति का बिगुल बजा त्याला आपल्या ‘अधिकारा’ साठी संघर्ष करण्यासाठी प्रेरित करून ‘सक्षम’ करते .
थिएटर ऑफ रेलेव्हन्स नाट्य सिद्धांत हे "नाटकाने परिवर्तन येते " ह्याची जिवंत प्रयोगशाळा आहे. भारतीय दृष्टीकोनांमध्ये पितृसत्तात्मक समाज , रुढीवाद , धार्मिक कट्टरवाद धारण केलेला वर्ग समाजाच्या प्रत्येक भागात व स्तरात अस्तित्वात आहे. थिएटर ऑफ रेलेवंस ने या आव्हानांचा एक योजनाबद्ध पद्धतीने सामना केला आहे. रंगचिंतक मंजुल भारद्वाज द्वारा लिखित आणि दिग्दर्शित नाटक "मैं औरत हूँ" ने स्त्री अस्तित्वावर भाष्य करून कितीतरी महिलांना स्वतः बद्दल, स्वतःच्या अस्तिवा बद्दल विचार करण्यासाठी प्रेरित केले. वेगवेगळ्या स्तरांवरील महिलांना - मुलींना जगण्याचा नवीन दृष्टिकोन दिला …
पितृसत्तेच्या व्यवस्थेला या नाटकाने आव्हान दिले, आपल्या अस्तिवाला शोधणा-या अर्ध्या लोकसंख्येचा आवाज बुलंद करणाऱ्या ' मैं औरत हूँ' नाटकाचे 1998 पासून ते आतापर्यंत 1000 हुन जास्त प्रयोग संपूर्ण भारतात झाले आहेत. या नाटकाच्या माध्यमातून सामाजिक स्तरांवर नवनवीन संकल्पना मांडल्या आहेत. "मैं औरत हूँ " नाट्यप्रयोगाने सांस्कृतिक कार्यक्रमांसोबत, आपले सणांना व उत्सवांना एक कलात्मक आणि वैचारिक दृष्टी प्रदान केली आहे. या नाटकाने सामाजिक उत्सवानिमित्त जनतेला (प्रेक्षकांना) ज्ञानात्मक व बोधात्मक मंच उपलब्ध करून दिला ज्याने “मैं औरत हूँ” नाटकाने सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीचे स्वरूप प्राप्त केले.
कार्यशाळां मध्ये एखादा विषय अजून सखोलतेने शिकवायचा असेल तर तो विषय आम्ही नाटकाच्या माध्यमातून सहभागीं समोर प्रस्तुत करायचो आणि मग त्याचे विश्लेषण व्हायचे. असाच एक अनुभव 'Gender Sensetisation' या विषयाला अनुसरून आम्ही मंजुल भारद्वाज लिखित "मैं औरत हूँ" या नाटकाची प्रस्तुती करायचो.
एकदा झाले असे की, नाटकाच्या प्रयोगानंतर दाढी मिशी असलेले पुरुष सहभागी या नाटकाच्या प्रस्तुती नंतर ओक्साबोक्शी रडला. त्यांचे मनोगत त्यांनी व्यक्त केले की, "आतापर्यंत आम्ही स्त्रियांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली. अगदी बाहेर समाज कार्य करून घरातील स्त्रीची कुचंबणा केली" पण आताच्या क्षणापासून आम्ही पितृसत्तात्मक भारतीय समाजाची मानसिकतेला नकारतो. या नाट्य प्रस्तुतीतून आम्ही त्यांच्या समोर विचार तर मांडायचो, पण त्याही पलीकडे एक महिला म्हणून जिथे स्त्रीकडे पाहण्याची एक कट्टर मानसिकता आहे अशा गावांमध्ये आम्ही एक माणूस म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली.
सक्षमतेची सुरुवात आधी स्वतःपासून होते...एक स्त्री जेव्हा सक्षम होते तेव्हा परिवार ही सक्षम होतो आणि परिवारासोबत समाज ही सक्षम होतो.. आणि जसजसा समाज आपल्या नवीन सकारात्मक आणि रचनात्मक निर्माणाच्या दिशेने मार्गक्रमण करतो देश आपोआप सक्षम होऊन जातो. म्हणून हे अनिवार्य आहे की देशातील स्त्रियांनी सक्षम होणे, कारण जेव्हा स्त्री प्रगतिशील असते तेव्हा तो देश खऱ्या अर्थाने प्रगत आणि विकसित होतो.
समाजाचे रचनात्मक परिवर्तन आणि न्यायसंगत व्यवस्थेची निर्मिती आपल्या कलात्मक प्रतिबद्धतेने साकारणारे कलाकार अश्विनी नांदेडकर, सायली पावसकर , योगिनी चौक , कोमल खामकर , तुषार म्हस्के.
आम्ही कलाकारांनी समाजात परिवर्तनासाठी पुढाकार घेऊन आपल्या परिवारासाठी, समाजातील अर्ध्या लोकसंख्येचा आवाज उठवण्यासाठी हा नाट्य जागर आयोजिला आहे, तरी आम्ही कलाकार आवाहन करत आहोत की, सामाजिक - वैचारिक परिवर्तनासाठी या नाट्य जागरात आपण पुढाकार आणि सहभाग घ्यावा.
Wednesday, 20 February 2019
नाटक राजगति ने बदलला राजनीतीला पाहण्याचा माझा दृष्टीकोन...
सुरुवात करेन अगदी अभ्यासक्रमा पासून – शालेय जीवनात political science हा माझा न आवडणारा विषय कारण त्याचे गांभीर्य, त्याचे महत्व आणि त्या विषयाचा अर्थ माझ्यापर्यंत कधी पोहोचलाच नाही.. पोहोचले ते फक्त घोकंपट्टीतले शब्द , प्रश्नांची उत्तरं आणि मार्क्स. म्हणजेच परीक्षेत पास होण्यापुरता तो विषय “विषय” वाटायचा.. परंतु हा विषय आयुष्याची जडण-घडण करणारा आहे याची जाणीव एका नाटकामुळे झाली.
राजनीती हा केवळ शब्द नाहीये... अनेक मानसिकता दर्शवणारी आणि त्यांना शुद्ध , सात्विकतेच्या मार्गावर आणणारी एक पवित्र नीती आहे, म्हणूनच त्याला राज-नीती म्हंटले जाते. अनेक मानसिकता, अनेक विचार, स्वभाव, रंग,भाषा या सगळ्यांना माणुसकी या तत्वाशी जोडणारी आहे राजनीती. खरं पाहता, प्रत्येक माणसामधली प्राणउर्जा आहे 'राजनीती'. हो, हा प्रश्न येणं साहजिक आहे कि एवढ्या पवित्र नीती ला वाईट का म्हंटलं जातं ? मुळात राजनीती वाईट नाहीच. राजनीती मध्ये असणारी माणसं, माणसांचे चरित्र ठरवतं कि मार्ग वाईट आहे कि चांगला. माणसांच्या आत दोन प्रवृत्त्या असतात – आत्मबळ आणि आत्महीनता. आत्मबळ स्वतःला रचनात्मक कार्य करण्यासाठी प्रेरित करते आणि आत्महीन प्रवृत्ती रचनात्मकतेला नष्ट करून न्यूनगंड निर्माण करते ज्यात माणूस स्वतःचाच विध्वंस करतो. ह्या दोन्ही प्रवृत्त्या प्रत्येक माणसात असतात, प्रश्न हा आहे कि कोणती प्रवृत्ती कशावर हावी होते. आत्मबळाने समृद्ध असलेला माणूस समाजाला घडवतो आणि नवीन सकारात्मक दिशा देतो, आणि हेच आत्महीनतेने ग्रासीत असलेला स्वतःसोबत समाजाला ही नकारात्मकतेने संक्रमित (infected) करतो.
राजगति या नाटकाने प्रत्येक माणसाच्या आत असणाऱ्या आत्महीन प्रवृत्ती चे निदान करून त्याला आत्मबळ प्रदान केले. म्हणजेच या नाटकामुळे हि जाणीव नक्कीच झाली कि एक उत्तम समाज घडण्याकरिता, सर्वप्रथम विचारांना महत्व देणाऱ्या माणसांची सक्त आवश्यकता आहे. राजगति या नाटकाच्या माध्यमातून मी स्वतःतल्या कलाकाराला आणि व्यक्तीला नवीन दिशा देऊ शकले. म्हणजेच यातून मला भगत सिंग समजला, महात्मा गांधी कळले, आंबेडकरांचे समाजाप्रती योगदान कळले आणि कार्ल मार्क्स ला जाणून घेतले. Performance मधून त्यांचे विचार मार्गदर्शन स्वरूपात स्वतः आणि प्रेक्षक पर्यंत पोहोचवता आले. नाटकाच्या संहितेतून आणि दृश्य रचनेतून हा विचार नक्कीच पेटतो कि हे व्यक्तिमत्व सामान्य असूनही असामान्य कार्य करून गेले, आपला देश आपल्याला परत मिळवून देण्यासाठी प्रत्येकाची भूमिका होती, आता आपली भूमिका आणि जबाबदारी उचलण्याची वेळ आहे, त्या क्रांतीवीरांचे तत्व , त्यांचे विचार आपल्यात कुठे आहेत त्याची जाणीव होणे महत्वाचे आहे.
राजगति नाटकात प्रत्येक विचारधारेचा सन्मान केला आहे, या नाटकात कुठल्याच पक्षाची , रंगाची , व्यक्तीची बाजू न घेता राजनीती ला समग्ररित्या पाहण्याचा कलात्मक दृष्टीकोन दिला आहे. या नाटकाने राजनीती मधील मुख्य चार बिंदूना रेखांकित केले आहे – सत्ता , व्यवस्था , चरित्र आणि राजनीती. आपण म्हणतो राजनीती वाईट आहे, परंतु राजनीतीच्या मार्गावर राजनीतिक चरित्र घडवणं गरजेचे आहे. प्रत्येक वेळी निवडणूक झाल्यावर सत्ता एकातून दुसर्याच्या हातात जाते पण व्यवस्था मात्र बदलतच नाही, आणि समाज तसाच गुरफटला जातो. इथेच राजनैतिक चरित्र घडवण्याचे काम नाटक “राजगति” करते. आपल्या स्वातंत्र काळात या क्रांतिवीरांनी लढा देऊन इतिहास रचला , आता वर्तमानात देशाची व्यवस्था आपण हाती घेऊन एक उज्वल भविष्य रचण्याची वेळ आहे. आताची गुलामी ही थेट विचारांवर प्रहार करणारी आहे, विचारांना नष्ट करणारी आहे आणि हा एक प्रकारचा विकारच आहे. आताच्या जनसामान्यांना या विकाराला तोंड देण्यासाठी रचनात्मक विचार निर्माण करणे आवश्यक आहे. आपल्यातले विकार संपवून विचारांची निर्मिती आणि चेतना जागृत करणारे नाटक "राजगति" प्रत्येकाने नक्की पहावे आणि अनुभवावे.
कोमल खामकर
थिएटर ऑफ रेलेवन्स अभ्यासक आणि रंगकर्मी
Saturday, 16 February 2019
बंदो में हैं दम.. वन्दे मातरम्...
आज भारत के सामने कईं प्रश्न हैं, उनमें से महत्वपूर्ण प्रश्न है - "हम कौन हैं ?".. क्या हम लिंग हैं - महिला , पुरुष , लड़का , लड़की... क्या हम धर्म हैं - हिन्दू , मुस्लिम , सिख , ईसाई , बहुजन.. क्या हम वर्ग हैं - ब्राह्मण , क्षत्रिय, वैश्य, शुद्र... क्या हम पद हैं - डॉक्टर, राजनेता, शिक्षक, मजदुर, सिपाही... या अपने अन्दर झांके और पूछे - क्या हम इंसान हैं ? - इंसान , इंसानियत....
बाजारवाद ने इंसानियत को खत्म करने का नया और प्रभावशाली हथियार चुना है खरीदो और बेचो, जो मनुष्य में बसी संवेदनाएं, भावनाएं और विचारों को खरीद कर उन्हें एक चलते फिरते शरिर तक में सिमित कर देता है, जिसके कारण मनुष्य अपने होने को नकार कर जीवन जीने से अलिप्त रहता है.. इस दौर में जहाँ बाजारवाद दिन भर दिन बढ़ता जा रहा है , जहाँ खुशियाँ खरीदी जाती है और विचार एवं तत्त्व बेचे जाते हैं वहां इंसानियत का टिकना मुश्किल होता है ! जैसे पेड़ से पत्तो का गिरना उन्हें मुरझा देता है , वैसेही मानवता के तत्त्व की जड़ से हम अलग हो जाये तो जीवन का मुरझा जाना निश्चित है...
हमारे देश को युवाओं के चैतन्यता की आवश्यकता है, जिसके लिए युवाओं का सकारात्मक एवं रचनात्मक तरीके से वैचारिक पोषण होना अनिवार्य है.. और इसीलिए थियेटर ऑफ़ रेलेवंस नाट्यप्रक्रिया पहल करती है - नाटक के माध्यम से स्वयं एवं सामाजिक, आर्थिक, राजनैतिक, शैक्षणिक, वैचारिक स्तर पर रचनात्मक परिवर्तन.. यह बदलाव की कलात्मक प्रक्रिया है..
हमने देखा है संघर्ष गांधी, भगत सिंह, अंबेडकर और कार्ल मार्क्स का , उनके जीवन को जीया है नाटक के माध्यम से नयी दृष्टी के साथ। अपने आपको परिचित किया है अपने भीतर की उन कोषिकाओं से जो इन क्रांतिवीरों में हुआ करती थीं। भारत की संस्कृति है - आत्मखोज और यही संस्कृति हमें भीतर से मजबूत बनाती है और चेतनात्मक व्यक्तित्व का निर्माण करती है..
आज के युवाओं की चुनौतियां क्या है - इंटरनेट , मोबाइल , बाजारवाद , भावनाओं को दिशा , संगत और अब आगे क्या करें ... उद्देश्य हो, ध्येय हो, अपने होने को साबित करने का तरीका स्पष्ट हो तो यह युवा भगत सिंह कहलाते हैं , अपने आप को पहचानना हमें गांधी बनाता है , अपना चिंतन प्रबुद्ध करता है । लेकिन आज गांधी की एहमियत केवल नोटों तक में दिखती है, यह दुर्भाग्य है।
थियेटर ऑफ़ रेलेवंस अंतर्गत प्रक्रियाओं का हासिल रहा -
1. युवाओं ने खोजा अभिव्यक्ति का अपना तरीका.. संवाद के माध्यम से जुड़े स्वयं से, अपनी जमीन से, सपनों से और समूह से.
2. स्वयं नियोजन, निर्णय एवं नियोजन का प्रवर्तन.
3. सहभागिता और पहल.
4. अपनी चुनौतियों को नाटक के माध्यम से पहचानना और उनपर स्वयं समाधान खोजना.
5. चैतन्य अभ्यास द्वारा अपने चिंतन को बढ़ाना..
थियेटर ऑफ़ रेलेवंस के नाटकों की विशेषता है की वे कलाकार को व्यक्तिगत प्रक्रीयाओं से रूबरू कराते हैं. अपने अन्दर झाँकने के लिए प्रेरित करते हैं और अपने अन्दर की सकारात्मक इच्छाशक्ति, कल्पनाशक्ति को बाहर निकाल कर व्यक्ति को उसके गुणों से परिचित कराते हैं.. मुझे अपने साथ साथ अपने समूह को , अपने परिवार को , अपने समाज को और अपने देश को आगे लेकर जाने की जिम्मेदारी निभानी है.. और इसीलिए विशेषकर व्यक्ति सचेतन , शुद्ध और सच्चा होना अनिवार्य है..
सहभागियों के स्वभाव, चिंतन, विचार, संकल्पनाएँ और अनुभव के बारीक़ आयामों पर लक्षपूर्वक मार्गदर्शन किया रंगचिन्तक मंजुल भारद्वाज ने.. हर चुनौती को सुलझाने का अलग तरीका होता है और अलग तरीके की खोज हमें आत्मखोज की तरफ ले जाती है.
कठोर
14 से 18 अप्रैल 2018
युसूफ मेंहर अली सेंटर , पनवेल
उत्प्रेरक - वैश्वक रंगचिंतक एवं दार्शनिक मंजुल भारद्वाज





















