Thursday, 5 April 2018

थिएटर ऑफ रेलेवंस नाट्य महोत्सव, पनवेल २०१७


थिएटर ऑफ रेलेवंस नाट्य महोत्सव, पनवेल
18,19,20 डिसेंबर 2017




          आपण नेहमी आपले आवडीचे काम मेहनतीने आणि जिद्दीने करत असतो. कारण त्यात आपली इच्छा सामावलेली असते. आवड निर्माण होते कारण आपली इच्छा असते आणि हीच इच्छा स्वतःकडून उच्च अपेक्षा निर्माण करते. अपेक्षा समाधानाची, आनंदाची, नवीन शोध घेण्याची, जगण्याची आणि स्वतःला घडवण्याची. “अभिनय” माझी आवड, आणि या आवडीला इच्छा आणि अपेक्षांमध्ये बदलणारी प्रक्रिया म्हणजे “थिएटर ऑफ रेलेवंस” नाट्यतत्व. आपल्या अभिनयाचे समाधान, त्यातून मिळणारा आनंद आणि कौतुक याने सतत पुढे जाण्याची जिद्द निर्माण झाली. “थिएटर ऑफ रेलेवंस” चे नाट्यमहोत्सव दिल्ली आणि मुंबई मध्ये संपन्न झाल्यानंतर आता वेळ होती पनवेलच्या रंगभूमीवर स्थापित होण्याची. मंजुळ भारद्वाज सर आणि आम्ही 6 कलाकार ( बबली रावत, अश्विनी नांदेडकर, योगिनी चौक, सायली पावसकर, तुषार म्हस्के आणि कोमल खामकर ) यांनी जणू महोत्सवाची मालिकाच सुरु केली. जसा पहाटे सूर्य उगवताना, संपूर्ण नभात हळूहळू सूर्याची किरणे पसरतात, तसेच प्रत्येक महोत्सवातून आम्ही कलात्मकतेची, मानवतेच्या विचारांची किरणे पसरवत होतो. आता वेळ आली आहे, रंगभूमीवर पहाट होण्याची.



          दिल्ली आपली राजधानी, मुंबई आपली कर्मभूमी आणि पनवेल आपली जन्मभूमी.. या जन्मभूमीला कलात्मकतेने उन्मुक्त करण्यासाठी आम्ही तयारीला लागलो. सर्वप्रथम “आयोजन”, कलाकार म्हणून प्रयोगागणिक प्रयोग सशक्त होत असताना आम्ही आयोजक म्हणून हि बळकट होत होतो. हि सुरुवात झाली “अनहद नाद – Unheard Sounds of Universe” या नाटकापासून, “कला उद्योजकता (Art Entrepreneurship)”, आपल्या नाटकाचे आपणच सर्वेसर्वा म्हणजेच उत्पादिकरण किंवा बाजारीकरणाच्या जाळ्यात न अडकता स्वतःच्या आयुष्याला अर्थ मिळवण्यासाठी “अर्थ” निर्माण करणे. आपण उत्पादक नाही आणि कला उत्पाद नाही म्हणजेच मी माझ्या कलात्मकतेची स्वतः निर्माती आहे. हा विश्वास मला थिएटर ऑफ रेलेवंस नाट्य प्रक्रियेने आणि मंजुळ सरांनी दिला. स्वतःच्या जगण्याचा अर्थ आणि स्वतःच्या कलाकृतीच्या सत्वाचा अर्थ, पनवेल मध्ये आयोजित केलेल्या नाट्य मोहोत्सावात साध्य झाला.

          एक आयोजक, कलाकार, सुजाण नागरिक, TOR ची अभ्यासक एवढ्या सगळ्या भूमिका माझ्यातली व्यक्ती जगत होती. त्यामुळे व्यक्तीला सहज, संतुलित आणि माणूस म्हणून रहाणे अत्यंत आवश्यक आहे हे समजले. एक उत्तम व्यक्ती तोच जो “माणूस” म्हणून जगेतो, आणि म्हणूनच तो निव्वळ व्यक्ती नाही व्यक्तिमत्व म्हणून ओळखला जातो. यावेळी माझी एक व्यक्तिमत्व म्हणून ओळख मी निर्माण करत होते. पनवेल महोत्सव आयोजित तर केले, पण आता प्रेषक कोण हा प्रश्न होता. आपले तीन वैचारिक नाटक पाहण्यासाठी आपल्याला गर्दी नको, सुबुद्ध प्रेक्षक हवे जे फक्त नाटक पाहायला नाही तर थिएटर ऑफ रेलेवंस ची नाट्यप्रक्रिया समजून त्याला पुढे नेण्यासाठी पुढाकार घेतील. शोधाला उद्देश्याची साथ मिळाली आणि दिशाविहीन न होता प्रत्येकवेळी आमची गती वाढत गेली आणि आम्ही ती वाढवत गेलो. प्रेक्षकांशी संवादकरून नाटकची संकल्पना पोहोचवत गेलो. सर आम्हाला बोलले होते आपल्या “अनहद नाद” नाटकामध्ये संवाद आहे “मैं ढूँढना चाहती हूँ उन आवाजों को जो मुझे मानव बनाना चाहती हैं” आणि हा आवाज ऐकणारे व्यक्ती कोण आहेत याचा शोध वाढत गेला... या दिवसात एकमेकांसोबत निसर्गाचे स्पंदन हि जुळत होते हे अनुभवले.. आपल्याला ज्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचायचे आहे, ते स्वतःच आमच्यापर्यंत येऊ लागले.. तेव्हा स्वतःतली सकारात्मक स्पंदनची उर्जा समजली आणि ती अधिक सशक्त होत गेली... कलाकार आणि व्यक्ती दोघांची एकत्र यात्रा सुरु झाली. मी प्रत्येक प्रेक्षकासोबत साधलेला संवाद वेगळा होता, कारण कलाकाराचे समृद्ध अनुभव व्यक्तीला सक्षम करत होते. व्यक्ती आणि कलाकार दोघेही एकमेकांना compliment करत गेले. मला हे प्रकर्षाने जाणवले कि कशी थिएटर ऑफ रेलेवंस नाट्यप्रक्रिया माणसाला त्याच्यातल्या कलाकाराच्या जिवंत असण्याची जाणीव करून देते. नाटक आता प्रत्यक्ष जीवनात उतरले होते, आणि नाटकात माझ्यातला कलाकार जसा कलेला न्याय देतो तसाच आयुष्यात मी एक व्यक्ती म्हणून जगण्याच्या न्यायसाठी संघर्ष करत होते.



          पहाटे उठल्यापासून ते रात्री पुन्हा निद्र अवेस्थेत जाई पर्यंत, सतत आजच्या दिवसाचे साध्य आणि पुढच्या दिवसाचे नियोजनाचे चक्र फिरत राहायचे.. आम्ही प्रत्येक प्रेक्षकांशी संवाद साधला – नातेवाईक, राजनैतिक पक्ष, शिक्षक, नवोदित / हौशी कलाकार, युवा, निर्माते, नाटककार, साहित्यिक, डॉक्टर, वकील, कलाकार आणि UNKNOWN..



          UNKNOWN चे orbit आता KNOWN व्हायला लागले.. या पाच कलाकारांची team एका वेगळ्याच विचारमंचावर प्रवेश करून कलेसाठी क्रांती घडवणार आहे याची कोणालाच कल्पना नव्हती.. हा कलाकारांचा समूह रंगमंचावर प्रवेश तर करतो, पण यांची exit मात्र होत नाही कारण हे प्रेक्षकांच्या मनात आणि विचारांमध्ये perform करतात.. पत्राकरिता असो किंवा box office वर बसणं, प्रिंटींग पासून रंगमंचावर उत्कृष्ट प्रस्तुती करण्यापर्यंत, आयोजन पासून अर्थ निर्माण करण्यापर्यंत हे सगळे आयाम थिएटर ऑफ रेलेवंस चे कलासाधक अगदी स्वतःच्या हिमतीवर गाजवतात.. स्वावलंबन आणि अस्तित्व घडवण्याच्या लढाईत होणारा संगर्ष , त्यासाठी लागणारी इच्छाशक्ती आणि मेहनत या कलासाधकांना थिएटर ऑफ रेलेवंस च्या नाट्यप्रक्रियेतून मिळते.. कारण हि नाट्या प्रक्रिया फक्त टास्क करण्यापर्यंत मर्यादित न ठेवता प्रेक्षकांना आणि कलाकारांना वर्तमानात आयुष्य जगण्याची नवीन उम्मेद आणि भविष्याची कलात्मक दृष्टी प्रदान करते..

   

No comments:

Post a Comment