रंगदृष्टी !
( भाग १ )
कला, अभिनय, performance हे क्षणिक नव्हे ! ही सतत उलगडणारी सात्विक प्रक्रिया आहे. कलाकार रंगमंचावर जेव्हा परफॉर्म करतात तेव्हा आपल्या शरीराला भूमिकेनुसार आकार देत नाटकाच्या ध्येयाला साकार करतात. थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य तत्वा अंतर्गत मी एक कलाकार म्हणून माझी रंगदृष्टी घडवत आहे !
धनंजय कुमार लिखित आणि मंजुल भारद्वाज दिग्दर्शित व अभिनित नाटक "सम्राट अशोक" मध्ये कलाकाराच्या शरीराचे निरनिराळे shapes, designs, dimensions आणि aura या बिंदूंवर अभ्यास करत अभिनयाला समजण्याचा नवीन आयाम उलगडत व मांडत आहे.
रंगमंचा चा मध्यभाग (centre) हा powerhouse समजला जातो, कारण मध्य म्हणजे " सृजनेचा केंद्रबिंदू ". नाटकाच्या सुरुवातीला स्टेज च्या मध्यभागी तीव्र प्रकाश होतो आणि एक वर्तुळ तयार होते. असे जाणवते की ते वर्तुळ ज्वालामुखीचे टोक आहे ज्यावर अभिनेता म्हणजेच " अहंकारी सम्राट अशोक " पाय रोवून उभा राहतो. त्याच्या पायांच्या तळव्याची ती भक्कम पकड, रंगमंचापासून मेंदूपर्यंत उर्जेचा संचार करत संपूर्ण vacuum अर्थात स्टेजच्या स्पेसला कलात्मक तरंगांनी भरते. आणि असे दृश्य दिसते जणू ज्वालामुखीचा उद्रेक होऊन सम्राट अशोक प्रकट होत आहे.
Illusion म्हणजे भास , पण असा भास जो आपल्या चेतनेला जागृत करून आलौकिक दृश्य जगण्याचा अनुभव देतो त्याला चेतनात्मक illusion असे म्हणतात, आणि अभिनय ही चेतनात्मक illusion निर्माण करणारी सृजन प्रक्रिया आहे, ज्याला थिएटर ऑफ रेलेवन्सचे कलासाधक उत्प्रेरीत करतात.
नाट्यगृह तेच, स्टेज तोच, तांत्रिक वस्तू ही त्याच परंतु सृजनकाराची सृजनसाधना प्रेक्षकांना एक अविस्मरणीय अनुभव देऊ जाते ! त्यांची रंगदृष्टी घडवत राहते.
क्रमशः
No comments:
Post a Comment